मराठी विभागजून १९७१ पासून वेणूताई चव्हाण कॉलेज,कराडच्या स्थापनेपासूनच अस्तित्वात आहे.विभागाला बी.ए.साठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची कायमस्वरूपी संलग्नता प्राप्त झाली आहे. विभागात २००८ पासून पदव्युत्तर (एम,ए,) शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच वरिष्ठ आणि प्रतिष्ठित शिक्षक विभागाशी संबंधित आहेत. विभागात नियमित अध्यापना बरोबरच सेमिनार, गटचर्चा, वादविवाद, विविध स्पर्धा, क्षेत्र भेटी आणि अतिथी व्याख्याने इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.या उपक्रमातून विद्यार्थांना विविध कौशल्ये अवगत होऊन व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते. विद्यार्थ्यांना जागतिक परिस्थितीत आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न केला जातो. यामागील काही प्रमुख उद्दीष्टे म्हणजे मराठी संस्कृती आणि मराठी साहित्याची विद्याथ्र्यांना ओळख करून देणे आणि त्यांच्यात साहित्यिक गुणांचा विकास करणे.
डॉ. निशिकांत मिरजकर हे संस्थापक प्रमुख म्हणून यशस्वी झाले. जी. एम. कुलकर्णी, डॉ. ए. एस. भडकमकर हे प्रख्यात लेखक, संशोधक, समालोचक होते.या विभागाच्या कार्यकाळात डॉ. एन. डी. मिरजकर, डॉ. ए. एस. भडकमकर, डॉ.एल. एन. मिरजकर, जी. एम. कुलकर्णी, व्ही. पी. गोखले, एम. वाय. सूर्यवंशी, डॉ. निर्मळे, श्रीमती एम. ए. कुलकर्णी, श्री. आत्माराम जाधव, श्री. ए. बी. खटकर, श्री. बिरा पारसे, डॉ. आर. ए. केंगार यांनी विभागाच्या वाढीसाठी त्यांच्या सेवांकाळामध्ये विभागासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सध्या प्रा. संतोष बोंगाळे, प्रा. व्ही.आय. आबेकरी, प्रा. पी. एस. चोपडे हे विभागात कार्यरत आहेत.विभागातील प्राध्यापक सदस्य नेहमीच मराठी साहित्याशी संबंधित विविध संशोधन उपक्रमांमध्ये गुंतलेले असतात.
मराठी विभागात मुद्रितशोधन आणि भाषा संपादन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. विभागात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी तयार करणे आणि साहित्यिक क्षमता वाढवणे याला नेहमीच प्राधान्य दिले जाते.